Share

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मानसिक त्रास, महिला वैद्यकिय अधिकाऱ्याची तक्रार

Published On: 

हिंगोली : हिंगोलीतील आरोग्य विभागात खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे. शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी हे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने केला आहे. याबाबत महिला डॉक्टरने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

याबाबत अधिक असे की, शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक अन् आस्थापना लिपिकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने केली आहे. महिलेने या प्रकाराची तक्रार आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे केली आहे. तसेच शासकीय रुग्णालयातील विशाखा समितीकडेही निवेदन दिले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी तसेच आस्थापना लिपिक चाऊस हे त्रास देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावर सीएस डॉ.सुर्यवंशी यांनी महिलेचे आरोप फेटाळलेत.

दुसरीकडे कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तसेच दारू पाजून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आहे. याप्रकरणी सैन्य दलातील एका जवानाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा जवान कसबे धावंडा येथील रहिवासी असून सध्या पंजाब राज्यात कर्तव्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गौतम हा गेल्या वर्षी गावी आला होता.

त्यावेळी गावातील एका तरुणीला १ ऑगस्ट २०१९ रोजी लग्नाचे आमिष दाखवून नांदेड येथे एका लॉजवर नेले. त्या ठिकाणी तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिच्यासोबत लग्नाचे नाटक करून तिला नांदेड येथे खोली देखील करून दिली. ता. १२ ऑगस्ट २०२० पर्यंत त्याने त्या तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर तिला गावाकडे पाठवून स्वतः कर्तव्यावर निघून गेला. या प्रकरणी तरुणीने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानूसार जवानाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!