🕒 1 min read
मुंबई: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला “भारताच्या सार्वभौमत्वाविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये”, असं सचिनने ट्विटमधून ठणकावून सांगितलं. मात्र, या ट्विटवरुन शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणाऱ्यांनी सचिनवर टीका केली आहे.
भाजपसह कायद्यांचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी सचिनला पाठींबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं’ असा सल्ला देत त्यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला होता. पवारांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडलं होतं.
‘शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे.’ असं भाष्य खोत यांनी काल साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना केलं होतं.
सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आता, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी प्रतिउत्तर दिल आहे. ‘सदाभाऊ खोत हे कोणाच्या बाबतीत बोलतात, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या काळात क्रिकेटचे ट्वेंटी-ट्वेंटी सामने सुरु झाले. पवार साहेबांच्या कार्यकाळात वर्ल्ड कप सुरु झालं, ते आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले नसले तरी गाव पातळीवर खेळले आहेत, असंही मेहबूब शेख म्हणाले.
आपण ज्या नर्सरीत शिकता, शरद पवार हे त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवल्याचा टोला शेख यांनी खोत यांना लगावला. सदाभाऊ खोत यांचा मुलगा जिल्हा परिषदेमध्ये पडला आहे, त्यांनी कोणाच्या बाबतीत बोलावं हे त्यांना समजत नाही’, अशा शब्दात शेख यांनी निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
- आझादांना पराजित करण्यासाठी पवारांनीच ठोकला होता शड्डू, मात्र ते अपयशी ठरले ; वाचा पवारांनी सांगितलेला किस्सा !
- रामजीवी म्हणत आव्हाडांनी उडवली भाजपची खिल्ली !
- काँग्रेस ‘या’ बाबतीत नक्कीच नंबर एकचा पक्ष बनेल; आशिष शेलारांचा टोला
- आंदोलनातूनच देश स्वतंत्र झाला, हे कदाचित मोदी विसरले – राजू शेट्टी
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
