उस्मानाबाद : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काही दिवसावर आली आहे. याच पार्श्वभुमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील मागील दोन वर्षापासुन रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे. मंगळवारी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी तुळजापुरात विलंब लागत असल्याने शिवप्रेमींमध्ये कमालीची नाराजी आहे. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी गुरुवारी नगरसेवकासंह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला होता. यात आता शेतकरी कामगार पक्षानेही उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणावरुन शहरात राजकारण तापू लागले आहे. आगामी कालावधीत पुतळा प्रकरणाला राजकीय रंग येवून पालिकेतील सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राजकीय सामना पहावयास मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण हे प्रशासकीय मान्यते आभावी रखडले आहे, असे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सांगितले आहे. प्रशासकीय मान्यता तत्काळ देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगरसेवकांसह उपोषण करणार आहोत. तर प्रशासकीय मान्यता मिळताच पुतळा सुशोभीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार असून याप्रकरणी राजकारण न करण्याचे आवाहन नगराध्यक्ष रोचकरी यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- आझादांना पराजित करण्यासाठी पवारांनीच ठोकला होता शड्डू, मात्र ते अपयशी ठरले ; वाचा पवारांनी सांगितलेला किस्सा !
- रामजीवी म्हणत आव्हाडांनी उडवली भाजपची खिल्ली !
- काँग्रेस ‘या’ बाबतीत नक्कीच नंबर एकचा पक्ष बनेल; आशिष शेलारांचा टोला
- आंदोलनातूनच देश स्वतंत्र झाला, हे कदाचित मोदी विसरले – राजू शेट्टी
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
