🕒 1 min read
पुणे : देशाबाहेरील कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यानंतर आता या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आहे. देशाबाहेरील कलाकारांनी देशाच्या अंतर्गत मुद्द्यावर भाष्य करण्याची गरज नाही. देश समर्थ आहे, असं सांगत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अक्षय कुमार, अजय देवगन, सायना नेहवाल यांच्यासह अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी ट्विट केलं होतं.
मात्र, या सेलिब्रिटींच्या ट्विटचा आशय सारखाच आहे. हा आशय सारखा असल्याने त्यांना कोणी हे करायला सांगितले का ? असा सवाल सामान्यांमध्ये उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
यानंतर भाजपने आक्रमक पवित्र घेत अनिल देशमुख व काँग्रेसवर घणाघात केला आहे. यामध्ये भारतरत्नाने सन्मान केलेल्या सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांचा देखील समावेश असल्याने भाजपने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आता, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘महाराष्ट्रात आता देशभक्ती हा गुन्हा झाला आहे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार, अजय देवगन आदींनी भारताच्या बाजूने वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र सरकार त्यांची चाकुशी करणार आहे. हाच आहे विदेशी विध्वंसक विचारांचा प्रभाव !,’ अशी बोचरी टीका प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
महाराष्ट्र में अब देशभक्ति गुनाह हो गया है। लता मंगेशकर, सचिन तेंदुलकर, अक्षय कुमार, अजय देवगन इत्यादि द्वारा भारत के पक्ष में दिए गए बयानों के कारण इन सभी की महाराष्ट्र सरकार जांच करेगी!
यही है FDI-Foreign Destructive Ideology का प्रभाव@mangeshkarlata @sachin_rt @akshaykumar— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) February 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- आझादांना पराजित करण्यासाठी पवारांनीच ठोकला होता शड्डू, मात्र ते अपयशी ठरले ; वाचा पवारांनी सांगितलेला किस्सा !
- रामजीवी म्हणत आव्हाडांनी उडवली भाजपची खिल्ली !
- काँग्रेस ‘या’ बाबतीत नक्कीच नंबर एकचा पक्ष बनेल; आशिष शेलारांचा टोला
- आंदोलनातूनच देश स्वतंत्र झाला, हे कदाचित मोदी विसरले – राजू शेट्टी
- उद्धवा, अजब तुझे सरकार…देतो म्हणालात दहा हजार, हातावर ठेवले दोन हजार…अजब तुझे सरकार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
