Share

अशोक चव्हाणांनी आरक्षणात घोळ घालून विरोधकांना कागदपत्रे पुरवली – आमदार मेटे

Published On: 

🕒 1 min read

जालना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांची नियुक्ती केली. मात्र चव्हाण हे या आरक्षणात घोळ घालत आहे. आणि काही कागदपत्रे विरोधी पक्षाला पुरवली, असा आरोप विनायक मेटे यांनी जालना येथे केला.

मराठा क्रांती मोर्चा आणि शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मराठ्यांचा एल्गार मेळावा आयोजित केला होता. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आणि एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या या मागणीसाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात विनायक मेटे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण या दोन नेत्यांना लक्ष्य केले. त्यांनी या दोन नेत्यांवर सडकून टीका केली.

मंत्री चव्हाण यांची हकालपट्टी करावी
मराठा समाजाचे काहीतरी चांगले व्हावे. या समाजाच्या माणसाने समाजाचे भले करावे या हेतूने त्यासोबतच न्यायालयात या प्रक्रियेला वेळ लागल्यामुळे आता तारीख पे तारीख मिळतेय. त्यामुळे केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी मंत्री चव्हाण करत आहेत असा सवाल देखील विचारला. मेटे यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली. मंत्री अशोक चव्हाण यांना या पदावर बसण्याचा अधिकार नाही. या वेळी चव्हाण यांनी राजीनामा देण्याची मागणी केली.

भरतीमध्ये ‘मलिदा’ पाहिजे का?
मराठा आरक्षणाला स्थगितीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच नोकर भरतीला सुरुवात झाली. पहिली भरती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुरू केली. त्यामुळे मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय होणार होता. मात्र या मंत्र्यांनी जाणून – बुजून ही भरती सुरू केली. कारण तीस टक्के मराठा समाजाचे हित जोपासत असताना उर्वरित 70 टक्के समाज या मंत्र्यांपासून दूर जाईल याची भीती त्यांना वाटत आहे. टोपे यांना या भरतीमधून किती मलिदा कमवायचा होता? याचा प्रश्न देखील समाजाने त्यांना विचारायला पाहिजे. सर्व भरती प्रक्रियेला आरोग्य मंत्री राजेश टोपेच कारणीभूत आहे.सल्यानेच एल्गार मेळाव्याची सुरुवात जालना जिल्ह्यातून केले असल्याचे विनायक मेटे यांनी जालना येथील कार्यक्रमात प्रतिपादन केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!