Share

पाचोड येथे आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर

Published On: 

🕒 1 min read

पाचोड : पैठण राज्य मार्गावरील  लिंबगाव (ता. पैठण) येथे भरधाव वेगातील आयशरने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या घटनेत एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात पाचोड पैठण राज्य मार्गावरील लिंबगाव ता. पैठण फाट्या नजीक रविवारी दुपारी घडली. संजय पंढरीनाथ गायकवाड (३९, रा. कोळी बोडखा ता.पैठण) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नारायण काकासाहेब भांड (४०, रा. वडजी ता.पैठण) हे गंभीर जखमी झाले आहेत

कोळी बोडखा येथील संजय गायकवाड, नारायण भांड हे दोघे जण दुचाकीने (क्रमांक एमएच – २० ईपी ७०६१) वरुन पाचोडहून वडजीकडे जात होते. दरम्यान पाचोड – पैठण रस्त्यावरील लिंबगाव फाट्याजवळ येताच पैठणहून पाचोडकडे येणाऱ्या भरधाव वेगाने आयशर (क्रमांक एमएच १६ – ए. वाय ०४२९) ने दुचाकीला समोरुन जोरदार धडक दिली.

यात संजय गायकवाड यांना गंभीर मार लागल्याने ते घटनास्थळीच गतप्राण झाला. तर पाठीमागे बसलेले नारायण भांड हा गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी दोघांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नारायण भांड यांच्यावर प्रथमोपचार करुन तातडीने औरंगाबाद घाटीत हलवले. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!