Share

डी मार्टची बनावट लिंक व्हायरल, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या !

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सध्या सोशल मिडीयावर डी मार्ट शॉपिंग गिफ्ट व्हाऊचरची बनावट लिंक व्हायरल होत आहे. यावर क्लिक करुन माहिती भरत जाल तर आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे अशा लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी केले आहे.

विशेष म्हणजे संबंधित बनावट लिंकवर क्लिक केल्यानंतर डी मार्टचा लोगो ओपन होतो, त्यामुळे ग्राहकांचाही त्यावर विश्वास बसत असल्याने सायबर भामट्यांनी हा नवीन पंâडा निवडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बहूतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. डी मार्टसारख्या कंपन्याकडून बहूतांश वेळा ऑफर्स येतात, त्यामुळे बनावट लिंकच्या जाळ्यात अडकण्यास सोपे जाते. सध्या सोशल मिडीयावर डी मार्ट ची बनावट लिंक धुमाकूळ घालत आहे. याद्वारे दहा हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर देण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.

ती ओपन केल्यानंतर डी मार्टचे सिम्बॉल (लोगो) दिसतो. त्यामध्ये एक गेम खेळण्याचे सांगितले जाते, यातून दहा हजार रुपयांचे व्हाऊचर लागल्याचे सांगून फसवणूक केली जात असून त्यावर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती भरु नये, अशा प्रकारापासून सावध रहा असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!