Share

परळी शहरात दहा लाखांची चोरी; काही दिवस आधिच आयजींकडून झाला आढावा

Published On: 

🕒 1 min read

बीड: विशेष पोलिस महासंचालक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी काही दिवसापुर्वी परळीत पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी केली. यावेळी त्यांनी वार्षिक तपासणीत पोलीस ठाण्याचे रेकॉर्ड कर्मचारी आणि तेथील व्यवस्था यांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गुरुवारी औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी विशेष पोलीस महासंचालक मल्लिकार्जुन प्रसन्ना हे औरंगाबाद येथे परतले होते.

विशेष पोलिस महासंचालक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या आढाव्यानंतर काही दिवसांत परळीत मोठी चोरीची घटना घडली आहे. शहराच्या नाथ नगरातील शेतकऱ्याचे घर भरदुपारी फोडले. एकूण दहा लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या वेळी चोरांनी १० लाख ७७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. चोरीच्या वेळी शेतकरी नेहमीप्रमाणे रविवारी शेतात कामानिमित्त गेले होते. या संधिचा फायदा चोरांनी उचलला.

परळी शहरातील नाथ नगर भागात शेतकरी रविकिरण अंगद गुट्टे त्यांच्या आई-वडील व मुलांसह राहतात. त्यांची सोनपेठ तालुक्यातील उखळी येथे शेती असुन नेहमीप्रमाणे ते रविवारी आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. त्यांची पत्नी घराबाहेर गेल्या होत्या. दरम्यान चोरांनी हीच संधी साधत दुपारी १२ ते ४ या वेळेत घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दोन तोळ्याचे बिस्कीट, १ तोळ्याच्या पाटल्या, २ तोळ्याच्या पाटल्या,१० तोळ्याच्या बांगड्या, २ तोळ्याच्या अंगठ्या व रोख २० हजार रुपये असा एकूण १० लाख ७७ हजार ५०० रुपयाचा ऐवज लंपास केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!