Share

‘देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- महाविकास आघाडी सरकारची स्थापन होऊन एक वर्ष उलटून गेले आहे. ठाकरे सरकार सध्या स्थिरावले असून सर्वात जास्त आमदार निवडून आले असतानाही भाजपला मात्र, सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. दोन दशके युतीत असणाऱ्या शिवसेनेने युती तोडत मुख्यमंत्रीपद मिळवले. शिवसेनेचे हे यश भाजपला पचलेले नाही. त्यामुळे भाजप नेते वारंवार ‘सरकार पडणार’चा जप करताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिलेत. फासा आम्हीच पलटणार. शिडीशिवाय फासा पलटणार, असं म्हणत राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली आहे.

दरम्यान, आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं म्हणत भाई जगताप यांनी हल्ला चढवला. तसेच याआधीच्या 7 दिवसात, 1 महिन्यात आणि 1 वर्षात सरकार पाडण्याच्या दाव्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं असल्याचं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृवावर विश्वास महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे. ते सरकार पडणार नाही, असंही वक्तव्य भाई जगताप यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!