Share

पैठणगेटवर डाव्या संघटनांचा कृषी कायद्यांविरोधात रास्ता रोको

Published On: 

औरंगाबाद : देशभरातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात पैठण गेट येथे डाव्या संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे संसदीय लोकशाहीला धाब्यावर बसवून केलेले कायदे रद्द करण्याची मागणी आंदोकांनी केली. देशविरोधी, शेतकरी विरोधी अन् कार्पोरेट धार्जिण नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात अडीच महिन्यापासून शांततेत अहिंसक मार्गाने हजारो शेतकरी दिल्ली सीमेवर ठिय्या मांडून बसलेत. अश्रूधुरांच्या कांड्या, दंडुक्यांचा मारा, थंडित थंड पाण्याचा फवारे मारले जात आहेत. शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्रातील सरकार हे दडपशाही अजूनही करत आहे. सरकारने आंदोलकांची रसद तोडण्यासाठी आंदोलन ठिकाणचे पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करून तोडला. या कृतीचा विरोध करत असल्याने आंदोलन करत असल्याच आंदोलकांनी या वेळी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले.

पैठणगेट येथे रास्ता रोको
दुपारी बाराच्या सुमारास पैठणगेट परिसरात किसान सभेच्या वतीने आंदोलन केले. केंद्र सरकार विरोधी घोषणा देत काही काळ रास्तारोको केला. वाहतूक खोळंबा झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्यांची रवानगी केली.

शेतकरी करार किंमत हमी सेवा कायदा 2020, शेतकरी शेतमाल व्यापार व विक्री कायदा, अत्यावश्यक वस्तू दुरूस्ती कायदा हे कायदे रद्द करण्यासाठी देशभरात आंदोलन चालू आहे, हे शेतकरी विरोधी तिन्ही काळे कायदे रद्द करा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या. शेती मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणारा कायदा करा. खरीप हंगाम २०२० चा पीक विमा वाटप करा. अतिवृष्टी अनुदान दुसरा टप्पा वाटप करा. प्रस्तावित वीज कायदा रद्द करा या मागण्या आहेत.

या आंदोलनात जन आंदोलन समितीचे निमंत्रक व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष भगवान भोजने, बुद्धीनाथ बराळ, जिल्हा सचिव डॉ. भाऊसाहेब झिरपे, शेकापचे डॉ. उमाकांत राठोड, भाई चंद्रकांत चव्हाण, भाकपचे अभय टाकसाळ, मधूकर खिल्लारे , एसएफआयचे नितीन वाव्हळे, बाबासाहेब भोसले, नंदकिशोर काबरा, मधूकर राठोड, नामदेव मोरे, दत्तात्रय काथार, संजय वाघ सह आदींना पोलिसांनी अटक करून क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये ठेवले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!