Share

ग्रेटा थनबर्गला अभिनेता प्रकाश राज यांचा पाठिंबा, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं ग्रेटाने म्हटलं होत.

भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गनं काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केलं होतं. ज्याबाबत दिल्ली पोलिसांनी केस दाखल केली होती. त्यानंतरही ग्रेटानं एक ट्वीट केलं होतं. हे ट्वीट रि-ट्वीट करत साउथ अभिनेता प्रकाश राज यांनी सुद्धा शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला आहे.

ग्रेटा थनबर्गनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, मी आताही शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचं मी समर्थन करते. कोणत्याही प्रकारची तिरस्कारयुक्त भावना, धमकी अथवा मानवाधिकारांचे उल्लंघन याला बदलू शकत नाही. ग्रेटाचं हेच ट्वीट रिट्वीट करत प्रकाश राज यांनी लिहिलं, ‘मी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना माझा पाठिंबा देतो.’

ग्रेटानं आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, ‘भारतात सुरू असेलेल्या शेतकरी आंदोलनात आम्ही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ एकजूटीनं उभे आहोत.’ ग्रेटाच्या या ट्वीटनं सर्वत्र खळबळ उडाली होती. एवढंच नाही तर ग्रेटाच्या आधी पॉप स्टार रिहानानं देखील ‘आपण याबाबत का बोलत नाही आहोत #FarmerProtest’ असं ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

देशात पेटलेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रेटा थनबर्गच्या रूपाने आवाज मिळाल्याचे बोलले जात आहे. ग्रेटा थनबर्गने यापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मोदी सरकारला घेरण्याची रूपरेखा असलेली एक टूलकिट शेअर केली होती. याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी अॅक्शन घेतली होती. दिल्ली पोलिसांनी ग्रेटाने शेअर केलेल्या टूल किटच्या लेखकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी खुलासा केला की, ग्रेटावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!