Share

‘बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री झाल्यास जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल’

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे राज्यात कॉंग्रेसची परिस्थिती सुधारली आहे. ते मुख्यमंत्री झाले तर जातीयवादी पक्षांचा सुपडा साफ होईल, असे मत नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले आहे.

मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात कॉंग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नागवडे बोलत होते.

यावेळी आमदार सुधीर तांबे म्हणाले की, थोरात यांच्या रूपाने निष्ठा, तत्त्व असलेले नेतृत्व मिळाले आहे. त्यांचे राज्यातील नेतृत्व जिल्ह्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाशी आणि पक्षावर प्रेम करणाऱ्या जनतेशी बांधिलकी, संवाद ठेवला, तर देशात सत्तांतर होऊ शकते, याची जाणीव ठेवून सक्रिय व्हावे, असे तांबे म्हणाले.

यावेळी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे म्हणाले की, जातिधर्मांच्या नावाखाली लोकांच्या भावना फडकावून भाजपने सत्ता काबीज केली. मोदी सरकारने एलआयसी, रेल्वे, विमानतळ विकायला काढल्याने देशाचा विकासदर ढासळला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन कानडे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!