🕒 1 min read
औरंगाबाद : स्मार्ट सिटीची हजारो कोटींची कामे सुरु असतांना राज्य शासनाने अचानक नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का बसला. मात्र काल (दि.५) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यात मनपा आयुक्तांची त्यांच्याशी झालेली जवळीक आयुक्तांसाठी टॉनिक ठरणार असल्याचे दिसते.
महापालिकेचे आयुक्तच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे काम पाहत असतांना राज्य शासनाने स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र या नियुक्तीवर आयुक्त पांडेय यांच्यासह सर्वच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर काल (दि. ५) औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आस्तिक कुमार यांचाच पदभार पूर्ववत ठेवण्यात यावा यासाठी निवेदन दिले.
मागील एक वर्षात स्मार्ट सिटी अंतर्गत एकूण ४३८ कोटी किमतीचे प्रकल्प ज्यात १५२ कोटीचे रस्ते, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे, पाणी पुरवठा योजना, स्मार्ट शहर बस, बस थांबे, बस डेपो, ई-गव्हर्नन्स, ऐतिहासिक दरवाजे, दमडी महल, नहर-ए-अंबरी आणि शहागंज घडीचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण ही प्रकल्पे पूर्ण झाल्याचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.
आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांची चाय पे चर्चा :
दिल्ली गेट येथील जलकुंभाच्या उद्घाटनानंतर जवळच असलेल्या आयुक्तांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी पुष्पगुच्छ भेट देत मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आयुक्तांचे चिरंजीव देवमानने हाताने काढलेले चित्र ठाकरेंना दाखवले. दोघांच्या संवादाची छायाचित्रे काल सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. या पार्श्वभूमीवर पांडेय यांची ठाकरेंशी आणि शिवसेनेशी निर्माण झालेली जवळीक पाहता स्मार्ट सिटीचे पद त्यांच्याकडेच राहणार यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या
- निदेशकांना नियुक्तीची प्रतीक्षा: कोरोना काळात विनामानधन काम केले
- ‘पीएमसी बँक’ पुनरुज्जीवनासाठी १ फेब्रुवारीपर्यंत तीन गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव
- बहुतांश प्रवासी रेल्वे गाड्या बंद असल्याने लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा होतोय खोळंबा
- जो रूटचं शतक आणि भारताच्या खराब गोलंदाजीबद्दल ट्विटरवर भन्नाट कमेंट्स
- आधी सामनातून टीका आता राऊत म्हणतात नाना सर्वांनाच प्रिय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
