Share

‘पीएमसी बँक’ पुनरुज्जीवनासाठी १ फेब्रुवारीपर्यंत तीन गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप बँकेवर आर्थिक निर्बंध लागू करून बँकेवर प्रशासक आणण्याच्या रिझर्व बँकेच्या निर्णयावरून सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रिझर्व बँकेनं पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर निर्बन्ध लादले होते. त्यावर बँकेच्या ठेवीदारांनी तक्रार नोंदवत, बँकेच्या अध्यक्ष आणि संचालकांनी आपल्या ठेवींचा गैरव्यवहार केल्याचा या ठेवीदारांचा आरोप केला होता.

एचडीआयएल या स्थावर मालमत्ता कंपनीला दिलेल्या ६,५०० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध आणल्यामुळे पीएमसी बँकचे सर्व व्यवहार बंद आहेत. दरम्यान, या निर्बंधामुळे खातेदारांचे कोट्यवधी पैसे बँकेत अडकले आहेत. त्यामुळे खातेदारांवर मोठे संकट ओढावले होते.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पार पडलेल्या आरबीआयच्या बैठकीत रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गैरव्यवहाराने डबघाईला आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेवर प्रशासक नेमून तिच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया राबवण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी तीन गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले असल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून १ फेब्रुवारीपर्यंत अंतिम प्रस्तावही आला असून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!