🕒 1 min read
नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला.
हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातही एक आवाज उठविला जात आहे की, हा प्रश्न पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. यामुळे यावर बोलण्याचा अधिकार फक्त भारतीय लोकांनाच मिळाला पाहिजे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही याबाबत सरकारला पाठिंबा दिला आहे. सचिनच्या या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.
#India: We call on the authorities and protesters to exercise maximum restraint in ongoing #FarmersProtests. The rights to peaceful assembly & expression should be protected both offline & online. It's crucial to find equitable solutions with due respect to #HumanRights for all.
— UN Human Rights (@UNHumanRights) February 5, 2021
त्यांनतर आता थेट राष्ट्र संघ – मानव हक्क आयोगाने देखील ट्वीट करत शेतकरी आंदोलना संदर्भात सरकारला सल्ला दिला आहे. “आम्ही भारतातील अधिकारी व आंदोलकांना सांगू इच्छितो की, शेतकरी आंदोलनादरम्यान जास्तीत जास्त संयम पाळावा. अभिव्यक्ती अधिकार शांततापूर्ण मार्गाने ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं सुरक्षित राखले जावेत. या मुद्द्यावर योग्य तोडगा काढणं सर्वांसाठी महत्त्वाचं झालं आहे,” असं राष्ट्र संघ – मानव हक्क आयोगाने म्हटलं आहे.
गाझीपूर, टिकरी आणि सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत असून, प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं आंदोलक शेतकऱ्यांवर आरोप होत होते. त्यानंतर तिन्ही ठिकाणावरील इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. त्याचबरोबर रस्तेही बंद करण्यात आले होते. त्यावर रिहानाने आपण यावर का बोलत नाही आहोत? असा सवाल उपस्थित केला होता. त्याचबरोबर ग्रेटा आणि मिया खलिफा यांनीही पाठिंबा दिला होता. त्यावरून भारतात वेगळाच वाद उभा राहिला.
महत्वाच्या बातम्या
- नव्या कार्यकारिणीतून काँग्रेसचं सोशल इंजिनिअरिंग, मराठवाड्यात पक्ष मजबूतीवर भर
- पोलिसांनी खिळे ठोकलेल्या जागेवरच आम्ही फुलं लावणार – राकेश टिकैत
- खा. इम्तियाज जलील, खा. फौजिया खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळावर निवड
- काय ! शास्त्रीचं वय चक्क १२० वर्ष आहे? विश्वास नाही तर सर्च करून पहा
- ‘टीम काँग्रेस’च्या जम्बो कार्यकारिणीसह नानांना शुभेच्छा !’ सामना अग्रलेख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
