🕒 1 min read
मुंबई : ‘वीरप्पन गँगचा पर्दाफाश करण्याबाबत मी एक ट्विट केलं होतं ते शिवसेना नेत्यांना झोंबले होते. मी आज पुरावे घेवून आलोय की विरप्पन गँग कशी खंडणी वसूल करते,’ असं सांगत भर पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या मांडल्या.
संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला आहे. यावर बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची खिल्ली उडवली होती. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला. “ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे”, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
मनसेला टाईमपास टोळी असं संबोधल्यानंतर संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे. गेली अनेक वर्षे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक मुंबईतील महापौर निवासस्थानी करण्याचे नियोजित आहे. मात्र, स्मारकाचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरु झालेलं नाही. यावरूनच संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे. ‘सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
सन्मानीय बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणे व अनेक वर्षे तिथे स्मारक न करण याला टाइम पास म्हणतात
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 5, 2021
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे; भाजप नेत्याचा प्रहार
- कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी नाना पटोले यांची वर्णी
- देव तारी त्याला कोण मारी, मुंडेंनी केला ‘त्या’ संकटाचा उल्लेख
- ‘तेव्हा सेलिब्रिटींना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का ? ज्यांचं सर्मथन करताय त्यांनाच समजवा’
- …अन अजितदादा आर आर आबांच्या आठवणीने गहिवरले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
