बीड : वारकरी संप्रदायातील थोर संत वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आज लाखो भक्तांच्या उपस्थितीत गहिनीनाथ गडावर मोठया उत्साहात पार पडला. वारकरी सांप्रदायासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे सिद्धपुरुष संत म्हणून वामनभाऊ महाराज यांची कीर्ती आहे. त्यांनी किर्तन, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात दिशादर्शक विचारांची पेरणी केली. अनिष्ठ रूढी, परंपरा बंद करण्याचा उपदेश करताना माणूस म्हणून जगण्याचा मूलमंत्र त्यांनी समाजाला दिला.
या कार्यक्रमास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, त्यांच्या भगिनी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे व पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. राज्याच्या राजकारणातील दोन बडे चेहरे, बहीण भाऊ आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही नेत्यांना गहिनीनाथ गडाने एकाच मंचावर आणलं होत. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही उपस्थितांना संबोधित केलं. पंकजा मुंडे मंचावर असताना धनंजय मुंडे यांनी भाषण करत या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो, असं म्हणाले.
गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या मंचावरुन धनंजय मुंडेंनी या मतदारसंघाचं नेतृत्त्व आपल्या खांद्यावर घेण्याचं भाष्य केलं, त्यामुळे दोन्ही भाऊ-बहीण एकाच मंचावर आले असले, तरी राजकीय कुरघोडी झाल्याचे पाहायला मिळाले. ‘संत वामनभाऊंवर, गडांच्या भक्तांवर, या सर्वांवर आपण असंच प्रेम आणि आशिर्वाद ठेवा. या गडाची, या मतदारसंघाची आणि बीड जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने माझ्या खांद्यावर घेतो’, असं धनंजय मुंडे म्हणाले.
‘अनेक वर्ष आपला जिल्हा पिछाडीवर आहे. आपल्या जिल्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून संबोधलं जातं. मात्र येणाऱ्या या चार वर्षात जिल्ह्याच्या समोरचं मागासलेपण हटवून, ऊसतोड मजुरांचा नाही तर ऊस पिकवणाऱ्यांचा जिल्हा अशी ओळख देण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे’, असं धनंजय मुंडेंनी आश्वासन दिलं आहे.
‘अनेक संकटं येतात जातात, मी कुठल्या संकटाला घाबरलो नाही. आताच्या संकटाचा उल्लेखसुद्धा एका महंतांनी केला. अशी किती जरी संकटं आली, तरी जनतेच्या मनात आपण स्थान निर्माण केलं असेल तर आशिर्वाद कधीच कमी पडत नाही. आजच्या या संकटातसुद्धा तुमचे आशिर्वाद माझ्या पाठिशी आहेत. देव तारी त्याला कोण मारी, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. जगातलं कुठलं मोठं पद, भविष्यात कोणतं महत्त्वाचं पद मिळेल की नाही माहित नाही, पण पुण्यतिथीच्या पूजेचं, या पवित्र पूजेची जबाबदारी जी तुम्ही दिली, आयुष्यात माझ्यासाठी सर्वात मोठं पद कोणतं असेल तर ती पुण्यतिथीची पूजा आहे, ती मला आज या गडातून मिळालं. यापेक्षा जास्त काही बोलणार नाही’, अस म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपावर भाष्य केल.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे; भाजप नेत्याचा प्रहार
- कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी नाना पटोले यांची वर्णी
- मराठा आरक्षणासाठी केंद्राने संवैधानिक तरतूद करावी ! अशोक चव्हाणांची केंद्राला गळ
- ‘तेव्हा सेलिब्रिटींना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का ? ज्यांचं सर्मथन करताय त्यांनाच समजवा’
- …अन अजितदादा आर आर आबांच्या आठवणीने गहिवरले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

