पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी पोलीस विभागाच्या कार्यक्रमात सहभागी झाले असता राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणीत ते भावुक झाल्याचं दिसून आलं.
आबांचे बंधू राजाराम पाटील यांची पिंपरी पोलिस आयुक्तालयातून कोल्हापूरला बदली झाली आहे. यानिमित्ताने अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पिंपरी-चिंचवड पोलीस विभागातर्फे निरोपाचा कार्यक्रम करण्यात आला. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे देखील या कार्यक्रमात हजर होते. ‘आबा आपल्याला लवकर सोडून गेले,’ अशा भावना व्यक्त करताना त्यांना गहिवरून आले होते.
यावेळी त्यांनी राजाराम पाटील यांचे कौतुक देखील केलं आहे. ‘भाऊ गृहमंत्री असूनही राजाराम पाटील यांनी त्याचं कधीच भांडवल केलं नाही. नाही तर काही जणांचा लांबचा पाहुणा गृहमंत्री असला, तरी तो पोलिस आयुक्तालय चालवतो, मात्र राजाराम पाटील यांनी कधीच गैरफायदा घेतला नाही,’ असं म्हणत त्यांनी आबांच्या बंधूंची पाठ थोपटली आहे. राजाराम पाटील हे जवळपास दोन वर्षांपासून सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत होते.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसवाल्यांनी रामाचे नाव न घेतलेले बरे; भाजप नेत्याचा प्रहार
- कॉंग्रेस ‘प्रदेशाध्यक्ष’ पदी नाना पटोले यांची वर्णी
- पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राखेर इंग्लंडच्या ५७ षटकात २ बाद १४० धावा
- सचिनचा भारतरत्न परत घ्या, संभाजी ब्रिगेडची मागणी
- ‘सुंदर आणि शार्दुलची बॅटिंग बघत होतो, तेवढ्यात डॉक्टरने बोलावलं’ विराटने सांगितला ‘तो’ किस्सा !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

