Share

‘तेव्हा सेलिब्रिटींना शेतकऱ्यांची आठवण झाली नाही का ? ज्यांचं सर्मथन करताय त्यांनाच समजवा’

Published On: 

पुणे : भारतातील शेतकरी आंदोलनाने सध्या अवघ्या जगाचे लक्ष वेधलेले आहे. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी रिहाना, ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनाला दर्शवलेल्या पाठिंब्यानंतर केंद्र सरकारच्या बचावासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसह काही खेळाडू व कलाकारांचा गट हा सरसावला आहे. या सेलिब्रिटींनी अचानक पुढाकार घेतल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेवर त्यांना प्रश्न केला असता त्यांनी सेलिब्रिटींना चांगलंच सुनावलं आहे. ‘सेलिब्रिटींना माझी विनंती आहे, दोन महिने उलटून गेले शेतकरी थंडी वाऱ्याचे आंदोलनाला बसलेत. याकाळात त्यांनी मत का नाही व्यक्त केलं ? कोणी थांबवलं होतं ?’ असा सवाल त्यांनी केला आहे. ‘आता बाहेरच्या सेलिब्रिटीला वाटलं भारताच्या शेतकऱ्यांबाबत लक्ष दिलं गेलं पाहिजे, ते त्यांचं मत आहे. त्यांनी मत व्यक्त केल्यावर इथं काहींना जग यायला लागली आहे. शेतकरी थंडी वाऱ्यात बसला आहे ते दिसलं नाही का ?’ असे खडेबोल अजित पवारांनी सुनावले आहेत.

पुढं ते म्हणाले, ‘अनेकांना आपला जीव गमवावा लागला, आपल्या नंदुरबारची भगिनी देखील देखील या आंदोलनात मृत्युमुखी पडली. तेव्हा हे कोणी तिकडे गेले नाहीत किंवा ज्यांचं हे समर्थन करत आहेत त्यांना ऐकून घेण्याची विनंती केली नाही. लोकशाहीमध्ये चर्चा करायची असते, पुढे-मागे सरकायचं असतं. पण त्यांनी काहीच केलं नाही,’ अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!