Share

आश्चर्यम! लातूर जिल्ह्यातून चक्क बस चोरीला!

Published On: 

🕒 1 min read

लातूर : लातूरच्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील बस आगारातून काही युवकांनी बस चोरून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ही गोष्ट माहित होताच एकच धावपळ सुरू झाली. पण दोन पोल आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडक दिल्यानंतर या वाहनाच्या चालकाने शेळगी रोडवर बस चालवणाऱ्या एका युवकाला पकडून बेदम चोप दिला. या घटनेतील तीन जण फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निलंगा आगारातील एमएच-२० बीएल ०२७१ क्रमांकाची एसटी बस गुरुवारी मध्यरात्री औराद शहाजानी येथील बसस्थानकात मुक्कामी होती. वाहक व चालक बसस्थानकात झोपले होते. ही मुक्कामी असलेली बस अज्ञात चोराने रात्री अडीचच्या दरम्यान पळवली. ही बाब लक्षात येताच चालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पेट्रोलिंग करीत पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबविली. पोलिसांना शेळगी येथे ही बस सापडली. चोराचा शोध सुरू असल्याची माहिती साहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी दिली.

दारू पिऊन बस पळवली
बसने विद्युत खांब, एका वाहनाला धडकली व खड्ड्यात जाऊन पडली. मालवाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाने बस चालवणाऱ्या युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका युवकाला पकडले. पण इतर दोन ते तीन जण फरार झाल्याचे वाहनचालकाचे म्हणणे आहे. बस पळवणारे युवक मद्यप्राशन केलेले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. बस पळवणाऱ्या युवकांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. फरार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!