मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे जमीन खरेदी केलेली आहे. या जमिनीच्या व्यवहारामुळे खडसे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद त्यागावे लागले होते.
यानंतरच्या काळात एकनाथ खडसेंना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पुणे व नाशिकच्या प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते. या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा ४० कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचं सांगितलं जात आहे.
या जमीन खरेदी प्रकारणामुळेच एकनाथ खडसे यांना ईडीशी सामना करावा लागत आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या हायकोर्टातील याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच या चौकशीची व्हिडिओग्राफ करण्याची मागणी या याचिकेत आहे. तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे.
खडसे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे मात्र, खडसे यांचे वकील इतर कामात व्यस्त असल्याने त्यांनी कोर्टाकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे खडसेंनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला होणार आहे. मुंबई हायकोर्टात ही सुनावणी होईपर्यंत खडसे यांना सरंक्षण मिळणार आहे. सुनावणी होईपर्यंत ईडीला त्यांच्याविरोधात काहीही कारवाई करता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आक्रमक होऊन परिस्थिती चिघळल्यास भाजप सरकारच जबाबदार असेल – शरद पवार
- सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे आठवलेंचा सन्मान !
- ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’
- भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याने राष्ट्रवादीला दिली तब्बल ५ कोटींची देणगी
- काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलणार; पवारांचा ऑफ द रेकॉर्ड गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
