🕒 1 min read
औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन जलवाहिनी योजनेच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर दीड महिन्यांनी अखेर प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला आहे. हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीने शहरात गरवारे स्टेडीयम, दिल्लीगेट, टिव्ही सेंटर, शिवाजीनगरसह सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्याच्या कामाला गुरूवारी (दि.४) सुरूवात करण्यात आली. तसेच जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात येणार्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचेही सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
शुक्रवारी (दि.५) शहरासह जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौर्यावर येत आहेत. ते शहरात येण्याच्या आदल्या दिवशीच जलयोजनेचे काम सुरू झाल्याने कुतूहल व्यक्त केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्तेवर येताच १६८० कोटी रुपयाच्या औरंगाबाद शहराच्या नवीन जलयोजनेला प्रशासकीय मान्यता दिली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकरवी पहिल्या टप्प्यात करण्यात येणार्या १३०८ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीची निविदा अंतीम करण्यात आली. त्यासाठी 1437 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करुन त्यास मंजूरी दिली आहे.
नुकतीच दोन दिवसांपूर्वी कंत्राटदाराने बँक गॅरंटी भरली आणि आज गुरूवारी सकाळी कंत्राटदारास वर्कऑर्डर देण्यात आली. तोच कंपनीने आधीपासूनच तयारी केलेली असल्याने गुरूवारी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. कंत्राटदाराने गरवारे स्टेडीयम, टिव्ही सेंटर, दिल्लीगेट, शिवाजीनगरसह सहा ठिकाणी जलकुंभ उभारणीच्या कामाला सुरूवात केली आहे. प्रारंभी १५ ठिकाणी जलकुंबांधण्याचे नियोजन केले आहे. तसेच नक्षत्रवाडी ते जायकवाडीपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी सर्वेक्षण करण्यास टीम कामाला लागली आहे, अशी माहिती आयुक्त पांडेय यांनी दिली. आगामी तीन वर्षात या योजनेचे काम पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
- ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका; जयंत पाटील कडाडले
- डांबरी रस्त्यांना सेनेचाच विरोध,’रस्ता खराब झाल्यास लोक शिव्या घालतात’-खैरे
- ‘नगरपालिका-नगरपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करुन देणार’
- ‘मनसेचे आंदोलन म्हणजे नौटंकी’, चंद्रकांत खैरेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
