🕒 1 min read
नवी दिल्ली:- कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.
दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं सरकारने अवघड केलं आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत.
मात्र गुरुवारी शेतकरी आंदोलकांनी सीमांवर पोलिसांनी लावलेले खिळे वाकवल्याचे वृत्त समोर येत आहे. गाझीपूर सीमेजवळ शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश करु नये म्हणून नाकाबंदी करण्यात आलीय. या ठिकाणी बॅरिकेट्सबरोबरच मोठ्या आकाराचे खिळे काँक्रीटच्या मदतीने उलटे लावण्यात आले आहेत. कोणी या ठिकाणांहून वाहने किंवा पायी जाण्याचा प्रयत्न केला तर हे खिळे घातक ठरु शकतात. त्यामुळेच शेतकऱ्यांनी या ठिकाणी लावण्यात आलेले खिळे वाकवले आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास हे खिळे वाकवल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र हे काम नक्की कोणी केलं यासंदर्भातील माहिती मिळालेली नाही. तसेच हे वाकलेले खिळे पाहून सकाळी अनेक शेतकऱ्यांनी हे खिळे काढण्यास सुरुवात केल्याचं चित्रही या ठिकाणी दिसून आलं. एएनआयने यासंदर्भातील काही फोटोही ट्विट केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणार नाही’
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- ग्रेटा थनबर्गने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये होते तरी काय ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
