Share

…असे गैरवर्तन तर रावणाने देखील केलं नसेल; करुणा शर्मा यांचे मुंडेंवर गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. या संदर्भात रेणू शर्मा यांनी पोलिसांकडे देखील धाव घेतली होती. मात्र, यानंतर रेणू शर्मा यांनी मुंडेंवरील तक्रार मागे घेतली होती. तसे त्यांनी पोलिसांना लेखी लिहून दिलं आहे.

मुंडेंवरील हे विघ्न तळल्यानंतर मराठवाड्यात त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे. कुठे जेसीबीने फुले उधळली जात आहेत, तर कुठे क्रेनने भले मोठे हार त्यांच्या गळ्यात घातले जात आहेत. धनंजय मुंडे देखील भावून झाल्याचं दिसून आलं. आता धंनजय मुंडे यांच्या अडचणी पुन्हा वाढणार असं दिसत आहे. धनंजय मुंडे यांचे संबंध असलेल्या करुणा शर्मा यांनीच आता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तर एक भावनिक फेसबुक पोस्ट शेअर करून धनंजय मुंडे यांच्या वर्तना रावणाहुन अधिक त्रासदायक असल्याचे आरोप केले आहेत. ‘आज माझा जन्मदिन आहे. पण माझ्या पतीने गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करून चित्रकूट या बंगल्यावर ठेवलं आहे. मला त्यांच्याशी बोलू व भेटू देखील दिलं जात नाहीये. राजकीय शक्तीचा इतका दुरुपयोग एवढे गैरवर्तन रावणाने देखील केलं नसेल,’ असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

https://www.facebook.com/karunadhananjay.munde.1/posts/161496982450290

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!