औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद दाभाडे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. मिलिंद दाभाडे यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीची शहरातील ताकत चांगलीच वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये मिलिंद दाभाडे यांचे वर्चस्व आहे.
बहुजन क्रांती दल या संघटनेच्या माध्यमातून मिलिंद दाभाडे यांचा शहरात चांगला जनसंपर्क आहे. या संघटनेच्या माध्यमातून अनेक चांगले कार्यकर्ते देखील त्यांनी तयार केले. आता बहुजन क्रांती दल हा वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीचे निरीक्षक फारुख सहमत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
मिलिंद दाभाडे यांनी त्यांचे कुटुंब गेल्या पंधरा वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करत आहे. आता वंचितच्या माध्यमातून कोणती जबाबदारी स्वीकारणार या प्रश्नावर बोलताना मिलिंद दाभाडे यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलन : पंतप्रधान मोदींची संसदेत उच्चस्तरीय बैठक सुरु
- रिहानाच्या ट्विटवर राहुल गांधींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, दिल्लीतील फौजफाट्यावरून मोदींवर टीका
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
