🕒 1 min read
मुंबई:- एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात सोमवारी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.
शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान, हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे.
पाटील यांच्या या पत्रावर पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यापेक्षा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना पायातील चप्पल काढायचं शिकवा, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
त्याचबरोबर आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. अशाप्रकारे हिंदूविरोधी वक्तव्य जर कुणी करत असेल तर त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल. त्याचा तपासही सुरु करण्यात आला आहे. पण विरोधकांनी हा मुद्दा केल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केलाय.
महत्वाच्या बातम्या
- भारताच्या ‘या’ क्रिकेटपटूचे ‘आयसीसी- मेन्स-प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन
- आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण- भालचंद्र शिरसाट
- रस्ता रोको किंवा इतर विरोध प्रदर्शनात सहाभागी झाल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही
- ‘तू शांत रहा, आम्ही तुझ्यासारखे मुर्ख नाही’; जगप्रसिद्ध पॉपस्टारला कंगनाच प्रतिउत्तर !
- शरजील उस्मानीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांचे थेट योगींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
