🕒 1 min read
जेजुरी:- जेजुरी गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर जेजुरी देवस्थानने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. तब्बल 20 फूट उंचीचा ब्रांझ धातूचा अहिल्यांबाईंचा पुतळा उभारण्यात आला आहे. याच पुतळ्याचं अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
शरद पवार यांच्या हस्ते येत्या 13 फेब्रुवारीला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
‘गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या राजमातांचा पुतळा देवस्थानाच्या वतीने उभारण्यात आलेला आहे. देवस्थान कमिटी कायमच राजमातांच्या क्रांतीकारी विचाराचा वसा घेऊन चालत आहे. सुमारे 20 फूट उंचीचा पुतळा देवस्थानामार्फत उभारण्यात आला आहे. यासाठी तब्बल 55 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध परवानग्या घेऊन लोकनेते शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार’ असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी; मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही’
- गंभीरच्या संभावित खेळाडू संघात हार्दिकसह या अनुभवी खेळाडूंना स्थान नाही ?
- ‘नीट काम करा, अन्यथा कारवाई’, धनंजय मुंडेंचा अधिकाऱ्यांना दम
- शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशांनाही झुकावं लागलं होतं; गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल
- नवीन आर्थिक वर्षासाठी २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर; १०० कोटींची अतिरीक्त मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
