बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल 336 कोटींच्या आराखड्यास मंजुरी दिली. जबाबदारीने काम करा नाहीतर कारवाईला सामोरे जावे लागेल असा सज्जड दम देखील मुंडे यांनी दिला.
कोरोनामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर होत असून विविध विभागातील सर्व स्तरावर त्याचा परिणाम झाला आहे. आर्थिक व सामाजिक बदल दिसून येत असून या काळात अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या, त्यासाठी जनतेचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे. जिल्हा नियोजनाचे काम करताना सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या शिरसाट, आ.प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. नमिता मुंदडा, आ.लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अपर्णा गुरव, जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
गेल्या एक वर्षात विकासकामे व अन्य लोकाभिमुख कामांना मोठ्या प्रमाणात निर्बंध लागले होते. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी आता सर्वांवर आहे, अशा परिस्थितीत सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने जबाबदाऱ्या पार पाडल्यास आम्ही सर्व लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू, कामात कसूर करणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही, अशी तंबीच आज मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिली.
राज्य शासनाने यावर्षी जानेवारी मध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु आर्थिक वर्ष संपत असल्याने कमी कालावधीमध्ये कामे करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे सदर निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठीदेखील राज्य शासन स्तरावर प्रयत्न करू असे मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- नेवासे तालुक्यातील रस्त्यांना ‘शंभर कोटी’चा निधी, नेवासा -शेवगाव रस्त्याची साडेसाती सुटणार
- रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग नंतर मिया खलिफा उतरली शेतकऱ्यांच्या समर्थनात !
- आगामी कसोटी सामन्यातील भारताच्या कामगिरीवर इंग्लंडच्या दिग्गजाचे भाष्य !
- मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू होणार
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे हे शिवसेनेचे ढोंग; संजय निरूपमांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

