Share

‘ज्ञानेश्वर’च्या अध्यक्षपदी नरेंद्र घुले पाटील तर उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- नेवासे तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार नरेंद्र मारुतराव घुले पाटील तर उपाध्यक्षपदी माजी आमदार पांडुरंग गमाजी अभंग यांची बिनविरोध निवड झाली आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या 21 जागांची निवडणूक माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि.21 जानेवारी रोजी बिनविरोध झाली होती.

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली. त्यात घुले व अभंग यांचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी आहेर यांनी केली.

यावेळी नरेंद्र घुले पाटील म्हणाले की, शेतकरी, कामगार-कष्टकर्‍यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची लोकनेते मारुतराव घुले पाटील यांची परंपरा आहे ती पुढे ही सुरूच आहे. ज्ञानेश्वर कारखाना हा शेतकरी-कामगारांचा कामधेनू आहे. कधी ऊस कमी तर कधी जास्त होतो. प्रत्येक हंगामात वेगळ्या अडचणी-संकटे येत असतात परंतु सर्वांचे योगदान व सहकार्याने येणार्‍या संकटांवर मात करू. कारखान्याचे माध्यमातून रचनात्मक कामे होत राहतील. सहकार हे धुडगूस घालण्याचे-राजकारण आणण्याचे क्षेत्र नाही. सर्वांना बरोबर घेऊन काम करू. शरद पवार यांनी चंद्रशेखर घुले पाटलांना राज्य साखर संघाचे अध्यक्षपदी संधी दिली हीच ज्ञानेश्वरच्या चांगल्या कारभाराची पावती आहे. राज्यातील पहिल्या सहा कारखान्यामध्ये ज्ञानेश्वरचे नाव आहे, असे ही घुले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!