🕒 1 min read
राजू थोरात, तासगाव : राज्य सरकारने नुकताच आदेश काढला आहेत व निवडणूका घेण्याचे आदेश जारी केले आहेत. राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा ‘अ’ वर्गातील ११६ मोठ्या सहकारी संस्था, सहकारी नागरी बँका, क्रेडिट सोसायटी, कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटी अशा ‘ब ’ वर्गातील मध्यम स्वरूपाच्या १३ हजार ८५, छोट्या क्रेडिट सोसायटी, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा ‘क’ वर्गातील १३ हजार ७४ आणि ग्राहक संस्था, कामगार संस्था अशा ‘ड’ वर्गातील २१ हजार संस्था अशा एकूण ४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या होत्या.
नुकत्याच झालेल्या तासगाव ग्रामपंचायत निवडणूकित बहुसंख्य ग्रामपंचायती मध्ये राष्ट्रवादी व भाजप यांनी युती करून समझोता एक्सप्रेस धावली होती. गेल्या 5 वर्षापूर्वी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील व सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक होती.
मतदान वेळी पागा गल्ली येथे भाजप व राष्ट्रवादी गट आमने-सामने आले तुंबळ हाणामारी झाली काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर काही पोलिस अधिकारीही या तुंबळ हाणामारीत सुटले नाहीत. त्या निवडनूकीत राष्ट्रवादीने एक हाती सत्ता घेतली व भाजपचा दारुण पराभव केला. गेल्या पाच वर्षापासून पुलाखालून पाणी बरेच गेले. भाजप व राष्ट्रवादीची समझोता एक्सप्रेस धावु लागली. आता कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत समझोता एक्सप्रेस धावणार का? की राष्ट्रवादी व भाजप आमने सामने येणार का ? हे पहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या
- देशात अवघड मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनचा पहिला क्रमांक !
- हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !
- ईव्हीएम ऐवजी आता मतपत्रिकेचा पर्याय ? नाना पटोलेंनी दिल्या महत्वाच्या सूचना !
- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे फार कठीण काम होते – शहा
- मोठी बातमी : CBSE बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

