नवी दिल्ली – संसदेत आज मांडण्यात आलेला 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणारा आहे असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अर्थसंकल्प तयार करणे हे नक्कीच फार कठीण काम होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी असा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प मांडला आहे की जो पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत, अर्थव्यवस्थेची 5 ट्रिलीयन डॉलर्सची भरारी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय’ अशा सर्व संकल्पांच्या पूर्तीचा मार्ग प्रशस्त करणार आहे असे ते म्हणाले. कोरोना महामारीच्या आपत्तीनंतर जागतिक अर्थव्यवस्था रिसेटींग मोड मध्ये आहे आणि अशा परिस्थितीत नवीन अर्थसंकल्प, भारताला जागतिक स्तरावर अधिक सशक्तपणे पुन्हा भरारी घ्यायला मदत करेल आणि येत्या काही वर्षांमध्ये भारत जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित होईल.
या कठीण काळात देखील, अर्थसंकल्पाने देशातील जनतेवर कोणतेही नवे कर लादले नाहीत, मात्र त्याचबरोबर आर्थिक दूरदर्शीपणा देखील शाबूत ठेवला. या सर्व प्रयत्नांचे दूरगामी परिणाम दिसून येतील आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला त्यातून पाठबळ मिळेल.
अमित शहा म्हणाले की आर्थिक सुधारणा हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे आणि गेल्या 6 वर्षांत जितक्या सुधारणा झाल्या तितक्या 70 वर्षांत देखील झाल्या नसतील. सुमारे 80 वर्षांपासून लागू असलेल्या विमा कायदा 1938 मध्ये प्रस्तावित केलेले बदल हे एक सकारात्मक पाऊल आहे. विमा क्षेत्रात यापूर्वी मंजूर असलेल्या 49% प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीचा वाटा वाढवून 74% केल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल. याशिवाय या अर्थसंकल्पात असे अनेक निर्णय प्रस्तावित आहेत ज्यांच्यामुळे बाजारातील भांडवलाच्या उपलब्धतेत वाढ होईल ज्यामुळे कर्जाची उपलब्धता आणि गुंतवणूक यावर मोठा सकारात्मक परिणान दिसून येईल असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- आता मुंबईकरांना सोयीनुसार लोकल प्रवास करता येणार ? राजेश टोपेंनी दिले संकेत
- ‘शरजीलवर कारवाई का होत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे’
- आता ६ फेब्रुवारीला शेतकरी करणार देशभर चक्का जाम
- भडकाऊ मजकूर, खोटय़ा बातम्या काही वेळात आपोआप डिलीट होतील ?
- महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली माहिती !


