Share

हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? देवेंद्र फडणवीसांची संतप्त प्रतिक्रिया !

Published On: 

मुंबई : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात काल भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.

शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज, हिंदुस्तानात हिंदू समाज वाईटरित्या सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाहीयेत, असा सवाल केला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘ शरजिल उस्मानी नावाचा डोक्याचा इसम हा पुण्यात येतो आणि त्या एल्गार परिषदेमध्ये हिंदूंबद्दल आक्षेपार्ह विधान करतो आणि यावर कोणतीही कारवाई होत नाही. हिंदू काय रस्त्यावर पडलेत ? या राज्यात काय मोघलाईचं सरकार आहे का ? शरम वाटायला हवी या सरकारला. आता चौकशी करू म्हणतायत, सगळीकडे त्याचे व्हिडीओ आहेत, चौकशी कसली करताय ?’ असा संतप्त सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान, ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करुन वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल, अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय’ असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शरजिल उस्मानीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!