Share

देशात अवघड मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनचा पहिला क्रमांक !

Published On: 

मुंबई : देशात अवघड परीक्षांमध्ये गणल्या जाणाऱ्या सीए-२०२०च्या नव्या अभ्यासक्रमाचा  निकाल आज जाहीर झाला आहे. चार्टर्ड अकाऊन्टंच्या जुन्या व नव्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सीए नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत मुंबईच्या कोमल जैनने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

हे अभिमानास्पद असून कोमलने 75 टक्के मिळवून देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. कोमलने आर. ए. पोदार कॉलेजमध्ये २०१९मध्ये बी कॉमचं शिक्षण पूर्ण केलं. तर याच दरम्यान ती सीए परीक्षेची तयारी करत होती. तिला ८०० पैकी ६०० गुण म्हजेच ७५ टक्के मिळाले आहेत. सुरतच्या मुदीत अग्रवालने दुसरा, तर मुंबईच्या राजवी नाथवनीने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.

दरम्यान, जुन्या अभ्यासक्रमापेक्षा नव्या अभ्यासक्रमाचा निकाल हा अधिक लागला आहे. सीए परीक्षेच्या जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल 5.84 टक्के तर नव्या अभ्यासक्रमाचा निकाल 14.47 टक्के लागला आहे. ‘सल्लागार किंवा वित्त यापैकी कोणत्या क्षेत्रात जायचं हे अद्याप ठरवलेलं नाही,’ असं कोमल जैनने सांगितलं आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांवर अधिक तणाव निर्माण झाला होता. अनेकदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर २०२० च्या नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष पद्धतीने घेण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!