Share

मोठी बातमी : CBSE बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रास देखील यामुळे अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या परीक्षा या लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे. तर, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या बोर्डांच्या परीक्षांचे वेध लागण्यास आता सुरुवात झाली आहे.

दरवर्षीप्रमाणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणारी CBSE बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. ‘१० वी, १२ वी CBSE बोर्डाच्या परीक्षा ४ मे पासून घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. ११ जून २०२१ पर्यंत या परीक्षा घेतल्या जातील आणि १५ जुलैपर्यंत या परीक्षांचा निकाल लावला जाईल,’ अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

आता CBSE बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक बोर्डच्या cbse.gov.in या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले असून विद्यार्थी आणि पालकांना त्या ठिकाणी परीक्षेसंबंधी सर्व माहिती मिळेल. दरम्यान, १० वी आणि १२ वीच्या प्रयोग परीक्षा(प्रॅक्टिकल), प्रोजेक्ट आणि अंतर्गत गुणवत्ता चाचण्या १ मार्च पासून ते लेखी परीक्षांच्या तारखेआधी घेण्यासाठी देखील महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे, असे देखील याआधीच स्पष्ट करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!