🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. या विजयासह गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला. अनुनभवी व युवा खेळाडूंना हाताशी धरत काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यामुळे, भारतीय संघातील खेळाडूंसह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे देखील सर्वजण कौतुक करत आहेत. आता, पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांनी देखील शास्त्री यांचे अभिनंदन केले आहे.
पाकिस्तानचे माजी कर्णधार राहिलेले व सध्या समालोचक म्हणून काम करणारे रमीझ राजा युट्युबवरून क्रिकेटसंबंधी अनेक विषयांवर चर्चा करत असतात. राजा यांनी म्हटले की, “रवी शास्त्री यांना विजयाचे श्रेय देण्यास मला आवडेल. कारण, त्यांनी ३६ धावांवर बाद झालेल्या संघाचे मनोबल वाढवले. संघातील सुपरस्टार खेळाडू हजर नसतानाही त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये असे वातावरण निर्माण केले की, तरुण खेळाडूंना आपण कोणापेक्षा कमी आहे, असे वाटू दिले नाही.”
रमीझ राजा यांनी आगामी भारत-इंग्लंड मालिकेविषयी बोलताना म्हटले, “इंग्लंड संघ चांगल्या तयारीने भारतात आला आहे. श्रीलंकेत त्यांनी विजय मिळवला. मात्र, भारतात त्यांची परीक्षा होईल. भारतात अखेरच्या वेळी कसोटी मालिका जिंकणारा संघ इंग्लंडचाच आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीचे खेळाडूदेखील ऑस्ट्रेलियामध्ये राहिले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियामधील दुसरी मालिका जिंकली. आता भारताचे मुख्य खेळाडू आणि विराट कोहली परतल्यानंतर तुम्ही संघाचा आत्मविश्वास कोणत्या पातळीवर असेल याची कल्पना करू शकता.”
दरम्यान, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. श्रीलंकेविरुद्धची सीरिज 2-0 अशी जिंकत इंग्लंडची टीम भारतामध्ये दाखल झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- २३ वर्षीय नंदिनी सलोखे ठरली महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’
- ताळमेळ नसलेला अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे होमवर्कचा अभाव : अशोक चव्हाण
- “भारतीय खेळाडू विराटला घाबरतात”, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘अर्थसंकल्पाच्या ‘कागदी घोडय़ां’चे ‘डिजिटल घोडे’ झाले एवढाच काय तो फरक’
- नांददेडमध्ये रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी लवकरच सुरू करणार क्रिकेट अकादमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
