🕒 1 min read
मुंबई : भरतामध्ये क्रिकेटचा चाहता वर्ग बराच आहे. भारतामधे क्रिकेटप्रेमींची संख्या बरीच आहे. तसेच भारतातील बहुसंख्य लोक हे स्वत: कधीतरी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न बाळगतात किंवा आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्याचे स्वप्न पाहत असतात. व आपल्या मुलांना क्रिकेटर बनवण्यासाठी देखील प्रयत्नशील असलेले दिसतात.
अनेक आजी- माजी खेळाडू हे क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर. आपल्या भविष्याचा विचार करता आपल्या अकादमीद्वारे युवा क्रिकेटपटूंना घडवण्याचे काम ते करत असतात. रॉजर बिन्नी, मदनलाल, दिलीप वेंगसरकर, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी या खेळाडूंच्या अनेक अकादमी कार्यरत आहेत. आता या साखळीत रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी यांचे नाव जोडले जाणार आहे.
वेगवान गोलंदाज कुलकर्णी याने सोमवारी (१ फेब्रुवारी) महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी क्रिककिंगडमचे पराग दहिवाल त्याच्यासोबत होते. या भेटीदरम्यान कुलकर्णी आणि दहिवाल यांनी अशोक चव्हाण यांच्याशी नांदेड येथे स्वत:ची क्रिकेट अकादमी सुरू करण्याबाबत विचारविनियम केला.
स्वत: अशोक चव्हाण यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. “प्रख्यात क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी नांदेडला क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहेत. कुलकर्णी व दहिवाल यांनी याबाबत माझ्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. ही अकादमी सुरू झाल्यास नांदेडच्या प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळेल”, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
याबरोबरच गोलंदाज कुलकर्णीनेही ट्विट करत आपल्या आपण नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्याबाबत अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली असल्याचे सांगितले आहे.
प्रख्यात क्रिकेटपटू रोहित शर्मा @ImRo45 व @dhawal_kulkarni नांदेडला क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छूक आहेत. कुलकर्णी व @crickingdom चे @paragdahiwal यांनी आज याबाबत प्राथमिक चर्चा केली. ही अकादमी सुरू झाल्यास नांदेडच्या प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळेल. pic.twitter.com/TIYLQwy1R0
— Ashok Chavan (@AshokChavan1958) February 1, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे’ ; एल्गार परीषेदेत शरजिल उस्मानी याच वादग्रस्त विधान
- रस्त्याचे काम वेगात करण्यात अडचण काय? पोलीस आयुक्तांनी सुनावले
- ‘ आजचा अर्थसंकल्प म्हणजे देश विक्रीची “लूट लो इंडिया स्कीम” ‘
- देशाला भकास करणारा व विश्वासघात करणारा अर्थसंकल्प ! – हुसेन दलवाई
- शेतकऱ्यांनी पुढे येऊन मुद्द्यांवर बोलावं ; मोदी सरकार चर्चेला तयार : निर्मला सीतारामन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
