🕒 1 min read
आग्रा : 23 वर्षीय नंदिनीने 53 किलोच्या गटामध्ये नॅशनल चॅम्पियन हा खिताब जिंकला आहे. तिच्या या कामगिरीने आता तिला देशाची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगटची तगडी प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. महाराष्ट्रातील मुरगुडच्या या कुस्तीपटूने दिल्लीच्या ममता राणीला आपल्या वेगवान आणि आक्रमक खेळाने 4-0 अशी आघाडी घेत चित केले आणि सुवर्णपदक पटकावत आग्रा येथे नॅशनल चॅम्पियनशीप मिळवली.
हरियाणाशिवाय महाराष्ट्रातून कुस्तीसाठी सुवर्णपदक पटकावणारी नंदिना ही पहिली खेळाडू ठरली. नंदिनी सांगते की, मी लहानपणी कब्बडी खेळत होते पण फार गांभीर्याने नाही. 2010 मध्ये माझ्या गावाजवळ नॅशनल स्पोर्टस् ऑथोरिटी आल्याचे समजले. तेव्हा मी तिथं उत्सुकता म्हणून गेले. दादा लवाटे नंदिनीचे प्रशिक्षक सांगतात, कबड्डी आणि कुस्ती या खेळात बरंच साम्य असल्याने तिला खेळ बदलायला फार वेळ लागला नाही, वेळ लागला तो तिच्या आईला यासाठी तयार करायला.
पहिल्या राज्यस्तरिय पदकाने तिला आणि तिच्या घरच्यांना मोठंच प्रोत्साहन मिळालं. मात्र त्यानंतरही तिच्या कष्टाला म्हणावं तसं फळ मिळत नव्हतं. याभागातील अनेक कुस्तीपटुंप्रमाणे नंदिनीही विस्मृतीत जाते की काय असं वाटत असतानाच नंदिनीने रविवारी राष्ट्रीय पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे. या निकालाने नंदिनी आता विनेशची पहिली प्रतिस्पर्धी ठरली आहे, जीने बर्याच काळानंतर राज्याला हा पर्याय दिला आहे. आणि टोकियो ऑलिम्पिकसाठीचा कोटा बुक केला आहे. नंदिनीला तिच्या आणि विनेश यांच्यातील स्पर्धेची जाणीव आहे. ‘विनेश अधिक अनुभवी आणि प्रौढ आहे. माझा मुख्य गुण म्हणजे माझा वेग. जर मी विनेशकडून चढाओढ कशी नियंत्रित करावी हे शिकले तर मला पुढं जायला मदतच होणार आहे’, नंदिनी सांगते.
महत्वाच्या बातम्या
- ‘हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे’ ; एल्गार परीषेदेत शरजिल उस्मानी याच वादग्रस्त विधान
- रस्त्याचे काम वेगात करण्यात अडचण काय? पोलीस आयुक्तांनी सुनावले
- “भारतीय खेळाडू विराटला घाबरतात”, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘अर्थसंकल्पाच्या ‘कागदी घोडय़ां’चे ‘डिजिटल घोडे’ झाले एवढाच काय तो फरक’
- ‘अर्थकारणातही ‘स्वप्नरंजन’ आणि राजकारण आणणारा यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प’

