Share

ताळमेळ नसलेला अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे होमवर्कचा अभाव : अशोक चव्हाण

Published On: 

नांदेड : काही दिवसापूर्वी एक शाळकरी मुलाचा पाढे म्हणताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा विद्यार्थी कोणताही ताळमेळ नसणारे पाढे म्हणत असतो. हा पाढे म्हणणारा विद्यार्थी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या दोघांची तुलना करत दोघांकडेही होमवर्कचा अभाव असला तरी आवेश मात्र अफलातून असे टि्वट करुन खरमरीत टिका  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पातुन काहितरी भरीव पुढे येईल असे वाटले होते. पण या सर्व अपेक्षावंर पाणी फेरत केंद्र सरकारने दिशाहिन अर्थसंकल्प मांडून कोरोना आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पिचलेल्या सर्वसामान्यांची, शेतकरी, कामगार, व्यापारी आणि उद्योजकांची आणखी पिळवणूक करण्याचे काम केले आहे. असे अशोक चव्हाण सांगितले.

आयकरात कोणताही बदल न झाल्यामुळे मध्यमवर्गीय नाराज आहेत. कृषीक्षेत्रामध्ये केलेली वाढ म्हणजे शेकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणार असे ते म्हणाले. पेट्रोल डिझेलचे भाव हे विक्रमी उच्चाकांवर गेले आहेत, या दरवाढीसाठी अतंरराष्ट्रीय तेल बाजाराच्या किमती कारणीभूत नसुन केंद्र सरकारने लावलेले कर आहेत. एकूण अपेक्षांभग करणारा हा अर्थसंकल्प आहे असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!