Share

“भारतीय खेळाडू विराटला घाबरतात”, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गजाचे वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. या विजयासह  गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.

भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघाचा नियमित कर्णधार करावे अशी मागणी सुरू झाली आहे. आता या विषयावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन लीने प्रतिक्रिया दिली. भारतीय खेळाडू विराट कोहलीकडून सल्ला घेण्यास घाबरतात, असे त्याने म्हटले. शेन हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रेट ली याचा भाऊ आहे.

ऑस्ट्रेलियासाठी ४५ वनडे सामने खेळलेल्या शेन लीने एका मुलाखतीत भारतीय संघाच्या कसोटी कर्णधारांविषयी आपली मते व्यक्त केली. तो म्हणाला, “रहाणे माझा कर्णधार असेल. कोहली हा आतापर्यंतचा एक महान फलंदाज आहे. मला वाटते की, तो संघातील खेळाडूंसाठी सन्माननीय आहे. त्यामुळे, खेळाडू त्याचा सल्ला घेण्यास घाबरतात. तो संघात पूर्ण व्यावसायिक खेळाडूंची मागणी करतो. त्यामुळे खेळाडूंना फिट राहावे लागते. संघातील खेळाडू मैदानावर उत्तम प्रदर्शन करतात पण ते थोडेसे घाबरलेले दिसतात.”

शेन ली पुढे म्हणाला की, “रहाणेच्या नेतृत्वात संघ अगदी निवांत दिसत असतो. संघाने त्याच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली असून त्याला भारतीय संघाचा कर्णधार होण्याचा हक्क आहे. भारतीय निवड समितीने रहाणेला कर्णधार बनवावे आणि कोहलीला फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगावे.”

दरम्यान, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड  यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. श्रीलंकेविरुद्धची सीरिज 2-0 अशी जिंकत इंग्लंडची टीम भारतामध्ये दाखल झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!