Share

‘सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी अर्थचक्र गतिमान करणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारने सन 2021 – 22 चा सादर केलेला अर्थसंकल्प हा कृषीक्षेत्राला नवसंजीवनी देणारा, मजूर कामगार गरिबांना आर्थिक न्याय देणारा, सामाजिक आणि आर्थिक समतेकडे भारताचे अर्थचक्र अग्रेसीत करणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प आहे. सर्व समाज घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प देशाला दिल्याबद्दल भारताचे द्रष्टे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज दिली.

‘यंदाच्या सन 2021- 22 च्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, कामगार, दलित, अल्पसंख्यांक अशा सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याचा महत्वपूर्ण विचाराच्या सूत्रा प्रकर्षाने दिसत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात सर्वांचा जीव वाचविण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय झाला. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे लोकसंख्या असणाऱ्या मोठे राष्ट्र आपला भारत आहे. या प्रचंड लोकसंख्येचा कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात होता. त्या सर्वांना जीवदान देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले.’ असं ते म्हणाले.

तर, ‘आता यंदाच्या क्रांतिकारी अर्थसंकल्पातून सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना आणि मजुरांना कामगारांना तर या अर्थसंकल्पातून नवसंजीवनी देण्यात आली आहे. दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य गरीब आणि दलित मागासवर्गीय वर्गाचे होत लक्षात घेऊन अत्यंत चांगला आणि आर्थिक बळ देणारा, आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे,’ अशा शब्दांत रामदास आठवले यांनी यंदाच्या 2021- 22 च्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!