🕒 1 min read
बेळगाव:- महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन आता राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
त्यानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलंय. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे.
दरम्यान, आता लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असं वक्तव्य केलं आहे. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी इतिहास वाचलेला नाही. त्यामुळे त्यांना इतिहास माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील सोरटूर गावचे. त्यांचे मूळ पुरुष बेळीअप्पा आहेत. कर्नाटकात दुष्काळ पडला म्हणून ते महाराष्ट्रात गेले. नंतरच्या पिढीतील शिवाजी महाराज आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहेत, असं गोविंद कार्जोळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोर बैठकांना सुरुवात
- तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा !
- देवगिरी कारखान्याच्या सर्वसाधारण बैठकीस आमदार गैरहजर; माजी चेअरमन काळे नाराज
- दिव्यांगाना मोठ्या प्रतिक्षेनंतर घरकुलाचा लाभ मिळणार
- राज ठाकरे यांच्या भेटीसाठी विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्या ‘कृष्णकुंज’वर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
