नांदेड : बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या लढ्याला अखेर यश आले असून महापालिका हद्दीतील दिव्यांगाना मोठ्या प्रतिक्षेनंतर घरकुलाचा लाभ मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने घरकुलासाठी प्रस्ताव मागवून घेण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे.
मागील अनेक वर्षापासून हक्काचे घरकुल मिळावे यासाठी कमाल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली नागनाथ कामजळगे व संजय सोनुले या बेरोजगार दिव्यांगांनी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणा दरम्यान सरन रचुन अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. परंतु आंदोलनस्थळी नांदेड दक्षिणचे आ.मोहन हंबर्डे यांनी भेट देवून चर्चा केल्याने हा अनुचित प्रकार टळला होता.
आ.मोहन हंबर्डे यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरत दिव्यांगांचे हक्काचे घरकुल न मिळाल्यास यापुढे आपण स्वतः यांच्यासोबत उपोषणाला बसू, अशी तंबी महापालिका प्रशासनाला देवून बेरोजगार दिव्यांगांना आत्मदाहणापासून रोखले होते. त्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले .अखेर कामाला लागत महिनाभर दिव्यांगांकडून यासाठी अर्ज मागवले होते.
अर्जाची प्रत्यक्ष तपासणी करून इतरही एखादा गरजू दिव्यांग घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी व अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगांना पाच टक्के घरकुल देण्याची तरतूद असल्याने बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांच्या मागणीनुसार बीएसयुपी योजनेअंतर्गत शिल्लक घरकुलाचा ही मिळण्याचा प्रस्ताव बीएसयुपी विभाग रूम नंबर 210 मध्ये 10 फेब्रुवारी पर्यंत दाखल करण्याचे सुचविले आहे. तसेच ज्यांनी प्रस्ताव दाखल केले आहे. त्यांनी नव्याने प्रस्ताव दाखल करू नये. प्रस्ताव दिलेल्या मुदतीतच डॉक्टर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एक असाही छंद : बारवांचा शोध घेण्यासाठी रोहन फिरतोय रानोमाळ
- ग्राहक मंचाचा एसबीआयला दणका, रक्कम व्याजासह देण्याचे आदेश
- गांधी स्मृतिदिनी अमेरिकेत पुन्हा महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना…
- ‘ऊर्जा खात्याला तातडीने 10 हजार कोटी द्या नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लवकरच अनावरण


