Share

राममंदिर निधीसाठी घरोघरी फिरलेच पाहिजे-आमदार सावे यांचा इच्छुक उमेदवारांना सल्ला

Published On: 

औरंगाबाद : राम मंदिर निधी संकलनासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करत, इच्छुक उमेदवारांनी तर घरोघरी फिरलेच पाहिजे असा सल्ला आमदार अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजप ओबीसी मोर्चाच्या मंडळ कार्यकारणी नियुक्ती प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

सावे भाषण करण्यासाठी आले असता यांनी सुरुवातीला घोषणा दिली, परंतु उपस्थित कार्यकर्त्यांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर असाच आवाज असला तर आपण मनपा कशी जिंकू, असा प्रश्न सावे यांनी उपस्थिती केला. हे ऐकताच कार्यकर्त्यांमध्ये त्स्फूर्ती आली. त्यानंतर पुन्हा जोरदार घोषणा झाल्या. त्यावर असा आवाज असेल तरच आपण मनपा जिंकू असे सावे म्हणाले. सावे यांनी त्यानंतर शहराध्यक्ष केनेकर यांचा मुंबई विमानतळावर लागलेल्या बॅनरचा किस्सा सांगत भाषण पूर्ण केले.

या सोहळ्यात खासदार कराड यांना सांगताना सावे म्हणाले की, हा कार्यक्रम माझ्या मतदार संघात आहे. त्यामुळे मला उपस्थित कार्यकर्त्यांची नावे घ्यावी लागेल. या वर चांगलाच हस्यकल्लोळ झाला. त्याबरोबरच सर्व उपस्थित नेत्यांनी देखील सावे यांनी घेतलेल्या नावांना उपस्थित सर्व म्हणत आपल्या भाषणाला प्रारंभ केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!