Share

एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलंय- शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या मधुकर पिचड व त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. वैभव पिचड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण लहामटे यांनी विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव केला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आज पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आले होते. त्यावेळी त्यांनी जुने सहकारी मधुकर पिचड यांना आपल्या खास शैलीत चिमटे काढले. एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला शरद पवार यांनी मधुकर पिचड यांना लागवला आहे. माजी आमदार कै.यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी, असं आवाहन शरद पवार यांनी केले. या भागातील सर्व नेते एकजुटीने सोबत आले. मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दीड वर्षापासून आमच्या‌ अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं, असा टोला शरद पवार यांनी पिचड यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!