Share

शास्त्रींना ट्रोल करणारे चाहते का मागतायेत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. जेव्हा भारतीय संघ एखादा क्रिकेट सामना पराभूत होतो, तेव्हा चाहते खेळाडूंसह शास्त्री यांच्या डोक्यावर संघाच्या पराभवाचे खापर फोडताना दिसतात. बऱ्याचदा या गोष्टीवरुन त्यांना ट्रोल केले जाते. परंतु आता चाहत्यांनी स्वत: शास्त्री यांची क्षमा मागितली आहे.

झाले असे की, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंचे कौतुक करताना ड्रेसिंगरूममध्ये तीन मिनिटांचे भाषण केले. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेत आपले पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजने उत्तम कामगिरी केली. या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत असताना शास्त्री यांनी देखील सिराजची स्तुती करत त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा शोध घोषित केले.

त्यांनी भारतात आल्यानंतर आपल्या सोशल मीडियावरील ट्विटर अकाऊंटवरून सिराजच्या बाबतीत एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी लिहले होते की, “गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी ज्या प्रकारे मोहम्मद सिराजने निभावली, त्या अनुषंगाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला लागलेला शोध आहे. सिराजने आपल्या वडिलांना गमावले, वर्णभेदावरुन टीका सहन केल्या. हे सर्व झाल्यानंतर ही तो भारतीय संघाचा दुवा म्हणून सोबत राहिला.”

ऑस्ट्रेलिया येथील मालिका विजयात खेळाडूंबरोबर शास्त्रींचाही तेवढाच वाटा आहे. ऍडलेड कसोटीतील पराभवानंतर संघाला धीर देण्याचे, त्यांना एकत्र आणण्याचे काम शास्त्री यांनी केले. सोबतच ते संघातील खेळाडूंचे कौतुक करण्यातही मागे पडले नाहीत. यामुळे शास्त्री यांच्या ट्विटवर क्रिकेट चाहत्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच शास्त्री यांना मागील काळात ट्रोल केल्याबद्दल त्यांची माफी देखील मागितली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!