औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) नव्याने सुरू केलेल्या बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टिम संदर्भात स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे शुक्रवारी (दि.२२) यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. मनपाच्या १ हजार ५१७ हून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांना १ फेब्रुवारीपासून बायोमेट्रिक हजेरी द्यावी लागणार आहे. मात्र यामुळे कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जरब बसेल असे बोलले जात आहे. पारदर्शकतेमुळे कामाच्या नावावर भटकत फिरणाऱ्यांना चाप बसेल.
मनपा प्रशासक तथा एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार, स्मार्ट सिटीच्या मास्टर सिस्टिम इंटिग्रेटर प्रकल्पात बायोमेट्रिक हजेरी करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात एएससीडीसीएलने मनपाच्या १ हजार ५१७ कर्मचाऱ्यांची हजेरी प्रणालीत नोंद केली आहे. शुक्रवारी मनपाचे स्वच्छता निरीक्षक, जवान आणि स्वच्छता कामगारांना बायोमेट्रिक उपस्थितीच्या सिस्टिमबद्दल, नाव नोंदणी, वापर आणि अहवाल देण्याचे सांगण्यात आले.
एएससीडीसीएलच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर यांनी सांगितले की, ‘बायोमेट्रिक हजेरी सिस्टिममुळे महापालिकेत पारदर्शकता येणार आहे. हजेरी संदर्भात अचूक नोंद ठेवली जाणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून वेळोवेळी अहवाल काढला जाऊ शकतो. एएससीडीसीएलने मनपाला शनिवारी (दि.२३) ५० बायोमेट्रिक उपकरणे दिली. मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे म्हणाले, ‘माहिती सर्वेक्षण तंत्रज्ञान (आयसीटी) आधारित बायोमेट्रिक हजेरी प्रणाली स्वच्छ सर्वेक्षणात गुण मिळवून देऊ शकेल’.
महत्वाच्या बातम्या
- “तो भारतीय फलंदाजीचा एक मजबूत स्तंभ आहे”, पुजाराच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया
- ‘स्मशानभूमीच्या समस्या दूर करा’, निलेगाव ग्रामस्थ रस्त्यावर !
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचे भावनिक भाषण, व्हिडिओ व्हायरल
- ‘ममतांना ‘जय श्रीराम’ घोषणा देणे म्हणजे; वळूला लाल कपडा दाखवण्यासारखे’
- ‘ऑस्ट्रलिया दौऱ्याआधी माझ्याकडे पंतने व्यक्त केली होती इच्छा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
