🕒 1 min read
पिंपरी:- २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरली कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाच खुल्या जागांवर एससी, एसटी प्रवर्गाचे उमेदवार भाजप उभे करणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस हा गौरव दिन म्हणून राज्य सरकार साजरा करेल ना करेल, पण भाजप, मात्र त्यांची आगामी जयंती (१५ नोव्हें.) गौरव दिन म्हणून साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानिमित्त पक्षाचे लाखो कार्यकर्ते आपल्या घरात बिरसा मुंडा यांचा फोटो लावून त्यांना नमन करतील, असेही त्यांनी जाहीर केले.
भाजपच्या प्रदेश अनुसूचित जनजाती तथा आदीवासी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकनिमित्त भोसरीत आयोजित मेळाव्यात चंद्रकांतदादा बोलत होते. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उदघाटन केलेल्या या मेळाव्याचा चंद्रकांतदादांच्या हस्ते समारोप झाला. शहराच्या महापौर माई ढोरे, मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री डॉ.प्रा.अशोक ऊईके, शहरातील भाजपचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, पूजा लांडगे, स्थानिक नगरसेवकांसह राज्यातील आदीवासी आमदार, खासदार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- वीज तोडणी प्रकरणी ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलनाचा आम आदमी पक्षाचा इशारा
- संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करणं हीच स्वर्गीय बाळासाहेबांना खरी आदरांजली – अजित पवार
- चीनसाठी मोदींची विशेष पंतप्रधान आवास योजना आहे का? – राष्ट्रवादी
- बीएचआर घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ! सुनील झंवर यांच्या मुलाला अटक
- रोजच्या जेवणात पनीरचा समावेश करताय ना; मग जाणून घ्या फायदे

