अहमदनगर : अवघ्या जगावर गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं सावट आलं आहे. या रोगावर लस बनवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी आटापिटा केला. सुमारे ८ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर जगभरात शास्त्रज्ञांना यश आलं. देशातील सिरम इन्स्टिट्यूटने पहिली लसीचा मान मिळवल्यानंतर या कंपनीचे जगभरात कौतुक केले गेले.
कोरोना काळात राज्यातील जनतेचे जीव कसे वाचवायचे या विवंचनेत असलेल्या राज्य सरकारने अशाही स्थितीत राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून आपापल्या मतदारसंघातील आरोग्यसेवा ठिकठाक करुन या महामारीशी थेट मुकाबला करणाऱ्या आरोग्य सेवकांना आवश्यक सामग्रीचा पुरवठा केला जाणे अपेक्षित होते. मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे.
शिर्डीचे खासदार व शिवसेना नेते सदाशिव लोखंडे यांनी कोणताच निधी आपल्या मतदार संघासाठी आणलाही नाही आणि खर्चही केला नाही. खरेतर कोविडच्या काळात नेहमीप्रमाणे खासदार लोखंडे हरवले होते. असे असतांनाही केंद्र सरकारच्या ‘गव्हर्न आय’ यंत्रणेद्वारा झालेल्या सर्वेक्षणात कोविडच्या काळात आपल्या मतदार संघात भरीव काम करणाऱ्या देशातील 25 खासदारांमध्ये त्यांचा समावेश झाला ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी लावलेले अनधिकृत फलक काढले म्हणून पोलिसांचा दुखावला इगो !
- राज्य सरकारने राणेंची सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने 12 कमांडोजची सुरक्षा पुरवली
- अर्नब गोस्वामी विरोधात कठोर कारवाई करा, उद्या कॉंग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
- …तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; वीजबिलावरून दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
- सिरममधील आगीमागे नेमकं कारण काय ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
