🕒 1 min read
मुंबई: ‘सैफ अली खानची वेब सीरीज तांडव सुरूवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता या वेब सीरीजवर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी भाजप नेते राम कदम यांनी मुंबईत या वेब सीरीजच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती आणि आता लखनऊमधील हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
त्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. ‘मी सुद्धा हिंदू आहे आणि मी तांडवच्या कोणत्याही दृश्यावर नाराज नाही. मग तांडव सीरिजवर बंदी का आणायला हवी?’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे. तिचे हे ट्वीट सध्या व्हायरल झाले असून चर्चेत आहे. अनेकांनी तिला या ट्वीटमुळे ट्रोल केले आहे.
I’m a Hindu and I’m not offended by any scene in #Tandav ..
Why #banTandavSeries #BanTandavNow ???— Swara Bhasker (@ReallySwara) January 19, 2021
दरम्यान, तांडव वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीनमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखवल्याच्या आरोप या वेब सिरिजवर करण्यात आला. भाजप नेत्यांनी या वेब सिरिजच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. आता तांडवचे निर्माते अली अब्बास जफर यांनी याबाबत जाहिर माफी मागितली आहे. याबाबतचे ट्विट करुन निर्मात्यांनी माफी मागितली. ‘वेब सिरिजच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता’, असे तांडवच्या ऑफिशिअल कास्ट एंड क्रूच्या वतीने सांगण्यात आले आहे. या वेब सिरिजच्या माध्यमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता असेही तांडवच्या संपूर्ण टिम कडून सांगण्यात आले आहे.
‘तांडव ही वेब सिरिज पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आम्ही लक्षात घेत आहोत. या वेब सिरिजमधील एका सीनमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. लोकांच्या धार्मिक भावना न दुखावता आम्ही या तक्रारी गांभीर्याने घेत आहोत. तांडव ही वेब सिरिज पूर्णपणे काल्पनिक आहे. यात दाखवण्यात आलेल्या घटना पूर्णता काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, जाती समुह त्याचप्रमाणे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तरिही ज्या लोकांच्या या वेब सिरिजमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांची आम्ही माफी मागतो’, असे ट्विट तांडवचे निर्माते अली अब्बास झफार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील हॉटेलची भन्नाट ऑफर ! थाली संपवा आणि जिंका रॉयल एन्फिल्ड बुलेट !
- अशोक चव्हाणांनी मराठा समाजाची फसवणूक केली; विनायक मेटेंचा घणाघात!
- गावचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच सोबत राहू; निलेश राणे यांनी केले विजयी उमेदवारांचे कौतुक
- ऋषभ पंतच्या झुंजार खेळीनंतर लाडक्या बहिणीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
