सावंतवाडी – समाजासाठी काही तरी करायच ही हेमंत मराठे यांची नेहमीच धडपड असते. त्यामुळेच मळेवाड गावाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. गावाने दाखवलेला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी व गावचा विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच सोबत राहू व मळेवाड ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील आदर्श मॉडेल म्हणून म्हणून ओळखली जाईल, असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, युवा नेते विशाल परब, महेश धुरी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.
शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मळेवाड ग्रामपंचायतवर भाजप पुरस्कृत पॅनेलने ११ पैकी ९ उमेदवार विजयी करत शिवसेनेचा गड काबीज केला. या विजयाचे शिल्पकार हेमंत मराठे यांच्यासह त्यांच्या ९ शिलेदारांची भेट घेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी विजयी उमेदवारांचे कौतुक करत शुभेच्छा निलेश राणे यांनी दिल्या.
यावेळी गावाचा विकास उद्देश समोर ठेवून आम्ही मैदानात उतरलो. मळेवाडच्या मतदारांनी आमच्या पॅनेलला विजयी करत मोठ्या मनाधिक्क्याने निवडून दिले. त्यामुळे आता जनतेला दिलेला शब्द पुर्ण करणार असल्याच सांगत मळेवाड ग्रामपंचायत जिल्ह्यात आदर्श ठरेल असा विश्वास यावेळी हेमंत मराठे यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील महिला व वकील संघटनांनी दिल्या शक्ती कायद्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- पायाच्या शस्त्रक्रियेसाठी कमल हसन रुग्णालयात दाखल; श्रुती हसनची ट्विटव्दारे माहिती
- मराठा आरक्षणाची आजची सुनावणी स्थगित; पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार
- ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा’
- वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करा : आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
